Tue, Jun 25, 2019 14:01होमपेज › Pune › मांजरी रस्ता बंद केल्यास तीव्र आंदोलन

मांजरी रस्ता बंद केल्यास तीव्र आंदोलन

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 28 2018 12:48AMमांजरी : वार्ताहर

हडपसर मांजरी बुद्रुक - वाघोली रस्त्यावरील (  प्रजिमा- 56)  मांजरी बुद्रुक गावाजवळील पुणे-सोलापूर महामार्गावरील गोपाळपट्टी गेट क्रमांक तीन येथे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होणार असल्याने 27 जुलैपासून हा रस्ता बंद करण्यात आला. उड्डाणपुलाचे चे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे 24 महिने हे रेल्वेगेट तसेच हा रस्ता वाहतुकीस बंद राहणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे. तसेच या रस्त्याला पर्यायी सुचवलेले दोन्ही रस्ते सध्या दुरवस्थेत आहेत. त्यामुळे या पर्यायी रस्त्यांची दुरुस्ती करावी तसेच रेल्वेगेट ही हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांनी दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मांजरी रेल्वेगेट वरती रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू होत आहे. हे काम जुलैपासून पुढील दोन वर्षे चालणार आहे. यादरम्यानच्या कालावधीत रेल्वेगेटसह मांजरी बुद्रुक-  वाघोली हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्याला पर्यायी रस्ता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने हडपसर साडेसतरानळी ते केशवनगर मांजरी रस्ता तसेच मांजरी बुद्रुक भापकर मळा द्राक्ष संशोधन केंद्र सोलापुर हायवे असे दोन पर्यायी रस्ते सुचवलेले आहेत. अवजड वाहनांसाठी नगर रस्ता खराडी बायपास ते मगरपट्टा हडपसर सोलापूर महामार्ग या मार्गाचा अवलंब करण्याचे कळविलेले आहे .तर हलक्या वाहनासाठी या दोन पर्याय मार्गाचा वापर करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे.

परंतु सद्यस्थितीत पर्याय रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. केशवनगर लोणकर वस्ती येथून साडेसतरानळी रस्त्यावर चिखल व खड्डे तसेच झाडांचे अनेक अडथळे आहेत. पुढे हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे येथून वाहने ये जा करताना नेहमीच वाहतूक कोंडी होत असते त्यातच भरीस भर म्हणून येथून पर्यायी वाहतूक वळविल्यास नियमित वाहतूक कोंडी बरोबरच अनेक समस्यांचा सामना येथील नागरिकांना करावा लागणार आहे.भापकरमळा या पर्याय रस्त्यावर ही अनेक ठिकाणी झाडांचा अडथळा आहे .काही ठिकाणी हा रस्ता अरुंद आहे याशिवाय पुणे सोलापुर हायवे वरती सिग्नलची व्यवस्था होणे आवश्यक आहे .त्यामुळे हा पर्यायी मार्गही काही प्रमाणात धोकादायक ठरत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

मांजरी बुद्रुक रेल्वे गेट क्रमांक तीन बंद केल्यानंतर मांजरी खुर्द ,आव्हाळवाडी, कोलवडी ,वाघोली येथील शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी व कामगार यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचवलेल्या केशवनगर-  साडेसतरानळी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून हा रस्ता अरुंद आहे. तर दुसर्‍यापर्यायी भापकर मळा रस्त्यावर काही ठिकाणी मोठया झाडांचा अडथळा आहे. वारंवार सांगूनही ही झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली नाहीत, तसेच पर्यायी असलेल्या या रस्त्यावर सुविधा उपलब्ध करून दिली नाही. तेव्हा मांजरी बुद्रुक रेल्वेगेट सुरू ठेवून काम करावे, येथून दुचाकी व चारचाकी हलकी वाहने वाहतूक सुरू ठेवावी, तर अवजड वाहतूक बंद करावी. पर्यायी रस्त्यांची दुरुस्ती ना करता आणि मांजरी रेल्वेगेट रस्ता सर्वच वाहनांना बंद केल्यास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, हवेली तालुका पंचायत समिती उपसभापती अजिंक्य घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी खलसे, अमर तुपे यांनी दिला आहे.

दरम्यान याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नकुल रणसिग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की रेल्वे विभागाने रेल्वेगेट बंद करण्याच्या अटीवरच येथील उड्डाणपूल करण्यासाठी परवानगी दिली आहे.त्यामुळे तेथून वाहतूक सुरू ठेवता येणार नाही. पर्यायी मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. झाडे काढण्यास वनविभागाने परवानगी दिली नाही.

सेनेचाही आंदोलनाचा इशारा

केशवनगर - साडेसतरानळी हडपसर या पर्याय रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी अरुंद रस्ता असल्याने तसेच रस्त्यावरचे खड्डे पडल्याने नेहमीत वाहतूक कोंडी होत असते.त्यातच  रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले नंतर पर्यायी रस्ता म्हणून वापर करावा असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविलेले आहे. परंतु या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास  हडपसर विधानसभा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा