Mon, Sep 24, 2018 08:05होमपेज › Pune › सारोळा स्मशानभूमी जिल्ह्यात आदर्श !

सारोळा स्मशानभूमी जिल्ह्यात आदर्श !

Published On: Jul 29 2018 1:24AM | Last Updated: Jul 29 2018 1:01AMसारोळा : वार्ताहर 

पुणे जिल्ह्यात आदर्श ठरावी अशी लक्ष वेधणारी स्मशानभूमी निरा नदीच्या काठावर पुणे-सातारा महामार्गालगत सारोळा (ता. भोर) येथे अभयसिंह धाडवे पाटील परिवार यांनी स्वनिधी खर्चून ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात ‘डेमो सेंटर’ अशी स्मशानभूमी वृक्षलागवड करून लोकार्पण केली. 

बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक अभयसिंह धाडवे पाटील यांनी पुढाकार घेऊन अद्ययावत अशी स्मशानभूमी मातोश्री द्रौपदीबाई दिनकरराव धाडवे पाटील यांच्या स्मरणार्थ  बांधून दिली. स्मृतिवनात 500 वृक्ष व फुलझाडे लागवड, सुशोभीकरण, संरक्षण भिंती, रंगरंगोटी,  विद्युतीकरण, नदीघाट निर्मिती, जुनी स्मशानभूमी पुनरुज्जीवित आदींमुळे जिल्ह्यात लक्ष वेधणारी स्मशानभूमी ग्रामपंचायतीचा 14.74 लाख, तर धाडवे पाटील उद्योगसमूहाने 35 लाखांहून अधिक खर्च करून ग्रामस्थांना बांधून दिली. 

अशी स्मशानभूमी सर्वत्र हवी

सारोळासारखी समृद्ध, अद्ययावत स्मशानभूमी सर्वत्र व्हावी. सारोळा स्मशानभूमी एकदा सर्वांनी पाहावी. धाडवे पाटील उद्योगसमूहाचा आदर्श घ्यावा.    - प्रभाकर देशमुख, माजी विभागीय आयुक्‍त