Fri, Apr 19, 2019 07:59होमपेज › Pune › राणेंना भाषणातून उत्तर देऊ : अजित पवार

राणेंना भाषणातून उत्तर देऊ : अजित पवार

Published On: Jan 25 2018 3:25PM | Last Updated: Jan 25 2018 3:18PMपुणे : प्रतिनिधी

माळेगाव  (ता. बारामती) ग्रामपंचायत पराभवाबद्दल अजित पवारांनी आत्मपरीक्षण करण्याच्या नारायण राणेंच्या टीकेला पत्रकार परिषदेत नाही, तर भाषणातून उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. आदर्श सरपंच पुरस्कार वितरण समारंभानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.

‘हल्लाबोल आंदोलनात अजित पवारांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणेंवर आगीतून उठून फुफाटयात पडल्याची टीका केली होती. दरम्यान, मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या नेत्याने मला मंत्री करा म्हणणे शोभत नाही अशी टीका अजित पवार यांनी नांदेड येथे केली होती. त्यावर ‘अजित पवारांनी बांधलेली धरणे रिकामी राहिली. ते मात्र तुडुंब झाले. माळेगाव ग्रामपंचायत पराभवाबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा टोला नारायण राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून लावला होता. त्यापार्श्वभूमीवर दैनिक पुढरीच्या बातमीदराने विचारलेल्या प्रश्नास राणेंच्या प्रश्नाला लवकरच उत्तर देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

बारामती तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीवर भाजपने आपला झेंडा फडकविला आहे. सोमवारी (दि. 22) झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत जयदीप विलास तावरे यांनी एका मताने बाजी मारत सरपंचपदाची खुर्ची पटकावली होती.