Mon, Aug 19, 2019 15:45होमपेज › Pune › पुणे: बायको आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

पुणे : बायको आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

Published On: Apr 24 2019 7:38PM | Last Updated: Apr 24 2019 7:38PM
पुणे : प्रतिनिधी

पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून एका पतीने ट्रेनखाली उडी घेत आपले जीवनच संपवल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्यातील कोंढवा येथील मोहम्मद असगर (वय ४०) असे या मृत तरुणाचे नाव आहे. असगर यांच्या वडिलांनी असगरची पत्नी अश्मा शेख, तिची आई, भाऊ आणि अश्माच्या प्रियकरांविरोधात समर्थ नगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनुसार समर्थ नगर पोलिसानी मोहम्मद असगरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरोधात कलम ३०६, ३२३,५०४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अश्माने असगर यांच्या कुटुंबासोबत वादावादी करत स्वतंत्र राहण्यासाठी आपल्या मुलाकडे हट्ट धरला. त्यामुळे माझ्या मुलाने कोंढवा येथे फ्लॅट घेतला. याठिकाणी ते दोघे रहायचे. सुन अश्माच्या छळाला कंटाळूनच माझ्या मुलाने घर सोडले व गेल्या १० महिन्यांपासून तो आमच्यासोबत राहत होता असे मोहम्मद असगरचे वडिल मोहम्मद शरीफ इस्माइल शेख यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

अश्मा आपल्या मुलाचा छळ करत होती. फ्लॅट तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणत होती असे इस्लाइल शेख यांचा आरोप आहे. पोलिसांना असगरकडे एक सुसाईड नोट सापडली. यामध्ये त्याने आपल्या आत्महत्येसाठी पत्नी, तिच्या प्रियकराला आणि तिच्या आईला जबाबदार धरले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.