Mon, Nov 19, 2018 00:03होमपेज › Pune › हडपसरमध्ये किरकोळ कारणास्तव पतीकडून पत्नीचा खून

पुणे: किरकोळ कारणास्तव पतीकडून पत्नीचा खून

Published On: Mar 14 2018 9:20AM | Last Updated: Mar 14 2018 9:26AM पुणे - प्रतिनिधी 

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना हडपसर येथे समोर आली आहे. हडपसर पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणास्तव दोघांच्यात वाद झाल्याचेही बोलले जात आहे. दोघांच्यातील वादाचे नक्की कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

रेणुका संजय पवार असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी संजय अर्जुन पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पत्नीच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.