Thu, Apr 25, 2019 13:58होमपेज › Pune › पुण्यातील मार्केट यार्ड झोपडपट्टीमध्ये भीषण आग

पुण्यातील मार्केट यार्ड झोपडपट्टीमध्ये भीषण आग

Published On: Apr 21 2018 11:40AM | Last Updated: Apr 21 2018 1:44PMपुणे प्रतिनिधी

मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत सकाळी भीषण आग लागली. घटनेटची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून  60 ते 70 जवानांचे पथक आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी धाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या एका जवानाला धुरामुळे त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मार्केट यार्ड परिसरातील आंबेडकरनगर झोपडपट्टीमधील झोपड्या जवळ जवळ असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. घटनास्थळी 3 ते 4 सिलेंडर फुटल्याची माहिती स्थानिकांनी दिली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी पसरली आहे. अग्निशमन दलाच्या गांड्याशिवाय  4 रुग्णवाहिका व 2 जेसीबीसह 8 ते 10 खासगी वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Tags : Huge fire,  Ambedkar Nagar, Pune, Police