Sun, Jan 20, 2019 00:11होमपेज › Pune › वडगावात हॉटेल व्यावसायिकाचा खून

वडगावात हॉटेल व्यावसायिकाचा खून

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 12:55AMवडगाव मावळ : वार्ताहर 

येथील हॉटेल व्यावसायिक योगेश प्रभाकर पगडे (वय 33, रा.पगडेवस्ती, सांगवी रोड, वडगाव मावळ) याचा अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
यासंदर्भात मृत योगेशचा भाऊ सचिन प्रभाकर पगडे (वय 28) याने वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीमध्ये म्हटले आहे कि, योगेशचा गुरुवारी वाढदिवस होता व वाढदिवसानिमीत्त त्याने शुक्रवारी रात्री घराजवळील शेतावर पार्टी ठेवली होती.

पार्टीसाठी योगेशचे काही मित्र जमले होते, रात्री उशिरापर्यंत योगेश घरी आला नव्हता. दरम्यान, आज(शनिवार) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सचिन शेताकडे जात असताना योगेश खापरे ओढ्याजवळ गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले.

त्याच्या डोक्यातून रक्त येत होते व पायांनाही गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात नेले असता रात्री दिड ते दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी चार जणांवर संशय व्यक्त करण्यात आला असून लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे, पोलिस निरिक्षक प्रदिप काळे, सहाय्यक निरिक्षक गणेश लोकरे पुढील तपास करीत आहेत.