होमपेज › Pune › "हॉर्न नॉट ओके प्लीज" मोहिमेची सुरवात

"हॉर्न नॉट ओके प्लीज" मोहिमेची सुरवात

Published On: Sep 12 2018 10:11AM | Last Updated: Sep 12 2018 10:11AMपुणे : प्रतिनिधी 

आ. टी. ओ पुणे आणि पुणे शहर वाहतूक पोलिस यांच्यातर्फे १२ सप्टेंबर हा ‘नो हॉर्न डे’ दिवस साजरा करत हॉर्न नॉट ओके प्लीज अभियानाचा शुभारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, वाहतूक उपायुक्त तेजस्विनी सातपुते, पुणे आरटीओ बाबासाहेब आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुधे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी  आम्ही पुणेकर हॉर्न वाजवणार नाही असा संकल्प केला. तसेच एम एच १२ हॉर्नचे वाजवा १२ असा संकल्प करण्यात आला.