Sat, Apr 20, 2019 23:54होमपेज › Pune › राष्ट्रवादीत इतिहासाची पुनरावृत्ती

राष्ट्रवादीत इतिहासाची पुनरावृत्ती

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 11 2018 1:09AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर 

‘एकाच प्रभागातील स्वपक्षीय नगरसेवकांमध्ये वाद’ या इतिहासाची पुनरावृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  होताना दिसत आहे .राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नात्यातील एका व्यक्तीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांच्या मुलाशी झालेले भांडण अन वाघेरे यांनी या वादात घेतलेली भूमिका हे याचे उदाहरण आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत अशोक थिएटर प्रभागातून राष्ट्रवादीतर्फे निवडून आलेल्या डब्बू आसवानी आणि नगरसेविका सुनीता राजेश वाघेरे यांच्यातील वाद चांगलाच रंगला. लहान मुलांच्या भांडणावरून हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले त्यावेळी पोलीस चौकीतच राजेश वाघेरे व डब्बू आसवानी यांच्यात जोरदार धुमशान झाले होते.

सन 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र 21 पिंपरीतुन राष्ट्रवादी काँग्रेसचे डब्बू आसवानी, उषा संजोग वाघेरे, निकिता कदम व भाजपचे संदीप वाघेरे निवडून आले आहेत मात्र संजोग वाघेरे व डब्बू आसवानी यांचे हल्ली जमत नाही फ्लेक्सवर एकमेकांची नावे, फोटो  न टाकण्यापर्यंत मर्यादित असलेले हे वाद आता वाढत चालले आहेत  नुकतेच वाघेरे यांच्या जवळच्या नात्यातील एक व्यक्ती आणि आसवानी यांचे चिरंजीव  यांच्यात किरकोळ कारणावरून झालेले भांडण पोलिसांपर्यंत गेले. यातून आसवानी आणि  वाघेरे यांच्यात ‘तू तू- मै मै’ झाल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीत एकाच पॅनेलच्या दोघात वाद या इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

कापसेंचा गोंधळात गोंधळ

राष्ट्रवादीत गोंधळ सुरू असतानाच सामाजिक कार्यकर्ते अमर कापसे यांनी साई चौकातील भुयारी मार्गाला दिलेले किमतराम आसवानी हे नाव बदलावे. प्रभागातील सिंधी, पंजाबी बांधवांच्या भावना जाणून ग्यानी इंदरजित सिंह अथवा सद्गगुरू श्री देवीपुरीजी महाराज (धुंदी बाबाजी) यांचे नाव भुयारी मार्गाला द्यावे अशी मागणी आयुक्तांकडे करून गोंधळात भर घातली आहे.