होमपेज › Pune › विद्यापीठातील ऐतिहासिक भुयार, संग्रहालय पाहण्याची उद्या संधी

विद्यापीठातील ऐतिहासिक भुयार, संग्रहालय पाहण्याची उद्या संधी

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 12:30AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ऐतिहासिक भुयार व नव्याने उभारण्यात आलेले संग्रहालय बघण्याची संधी शुक्रवार, दि. 13 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या हेरिटेज वॉकसाठी विद्यापीठातील दत्तो वामन पोतदार संकुलात (विद्यार्थी विकास कार्यालयाजवळ) जमावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

या वारसा दर्शन (हेरिटेज वॉक) उपक्रमांतर्गत विद्यापीठातील 250 ते 300 फूट लांबीचे ऐतिहासिक भुयार आहे. तसेच ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात आले आहे. वारसा दर्शन कार्यक्रमाच्या अंतर्गत या दोन्ही गोष्टी तसेच, विद्यापीठातील ऐतिहासिक वास्तू, तिचा इतिहास व विविध वैशिष्ट्ये या सर्व गोष्टींची सविस्तर माहितीदेखील दिली जाते. विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थितांना या सर्व गोष्टींचा परिचय करून देतील. उन्हाळ्याची सुटी अनेक शाळांना लागलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांना हा वारसा पाहता यावा, यासाठी भुयार व संग्रहालय खुले ठेवण्यात येणार आहे. विशेषत: विद्यार्थी व इतिहासाबद्दल आस्था असलेल्या नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.