Wed, Mar 27, 2019 05:57होमपेज › Pune › हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Published On: Apr 22 2018 1:29AM | Last Updated: Apr 22 2018 1:24AMपुणे : प्रतिनिधी 

डुक्कर खिंडीजवळ एका सोसायटीतील फ्लॅटवर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने तेथे चालणार्‍या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफ़ाश केला आहे. तर उजबेकिस्तानच्या एका तरुणीची सुटका करून कुख्यात कल्याणी देशपांडे हिच्या दीरासह दोघांना अटक केली.

नीलेश सूर्यकांत देशपांडे (42, वंडर फ्युचर) व  शिवा गोविंद महाविरसिंग या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. जस्मीन एजंट हिच्यासह अटक केलेल्या दोघांवर  याच्यासह एकूण तिघांवर कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  केला. 

पोलिस नाईक नितीन तेलंगे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, नीलेश देशपांडे व शिव गोविंद सिंग हे दोघे परदेशातील मुलींकडून एजंटांकरवी डुक्कर खिंड येथील वंडर फ्युचर येथील फ्लॅट क्रमांक टी 303 मध्ये सेक्स रॅकेट चालवत आहेत. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकून उजबेकिस्तान येथील तरुणीची सुटका केली. तसेच तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणारे तोमर व नीलेश देशपांडे यांना फ्लॅटमधून ताब्यात घेण्यात आले. तर जस्मीन एजंट याच्यासह अटक केलेल्या दोघांवर कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा केला. 

नीलेश देशपांडे हा 2016 मध्ये मोक्काच्या गुन्ह्यात अटक केलेल्या महिलेचा दीर असून त्याच्याकडे मिळालेल्या फोनमधून महिला आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. त्याबाबत पोलिसांकडून पडताळणी सुरू आहेत. तर शिवा तोमर हा हिंडवडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार असून त्याचा शोध सुरु आहे.