Wed, Apr 24, 2019 15:58होमपेज › Pune › कोंढव्यातील हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

कोंढव्यातील हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

Published On: Mar 24 2018 1:52AM | Last Updated: Mar 24 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी

कोंढवा परिसरात एका सोसायटीत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असणार्‍या हायप्रोफाईल वेश्याव्यवसाचा गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून, पोलिसांनी छापा टाकून या ठिकाणावरून दोन परदेशी तरुणींसह चौघींची सुटका केली आहे. 

याप्रकरणी पूनम कुंदन जहाँगीर, कर्मचारी फौजिया ऊर्फ झेबा अंजुम शेख  (दोघी रा. उंड्री, कोंढवा) मंजूर समशुद्धीन आलम (रा. न्याती टॉवर, निको गार्डन, विमाननगर) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पूनम जहाँगीर ही कोंढवा येथील सनश्री वुड्स बिल्डिंगमध्ये श्रद्धा वेलनेस मसाज सेंटरच्या नावाखाली परदेशी मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून याठिकाणी शहानिशा करण्यात आली. 

त्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक निरीक्षक शीतल भालेकर, रुपाली चांदगुडे, ठोंबरे, जाधव, गायकवाड यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकून पूनम जहाँगीरसह दोघांना ताब्यात घेतले. 

 

Tags : pune, pune news, crime, Kondhav, High profile Prostitution,