Mon, May 20, 2019 22:26होमपेज › Pune › रक्तापलीकडे नाते जपणारा ‘हेल्पिंग हॅण्ड्स फॉर ब्लड ग्रुप’

रक्तापलीकडे नाते जपणारा ‘हेल्पिंग हॅण्ड्स फॉर ब्लड ग्रुप’

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 29 2018 10:53PMपुणे : समीर सय्यद

सध्या सोशल मीडिया अन् विशेषतः व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यात ‘अर्जंट’ मदतीचे अन् मनाला भिडणारे अनेक मेसेज पाहतो. त्यातील बहुतांश मेसेज हे खोटेच असतात. त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो. अनेक मेसेज हे खोडसाळपणाने टाकलेले असतात. पण, असाही एक ग्रुप आहे, अन् तोही फेसबुकवर, जो याच मेसेजवरून पाहिजे तेथे आणि पाहिजे त्या रक्तगटाचा रक्तदाता पुरवतो. ‘हेल्पिंग हॅण्डस् फॉर ब्लड’ असे या अनोख्या ग्रुपचे नाव आहे.हा ग्रुप गेल्या 6 वर्षांपासून रक्तदाते उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक तर होत आहेच, पण त्यांना जीवनदाते म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

नवी मुंबईच्या राहुल साळवे यांचा 2012 मध्ये मोठा अपघात झाला होता. त्यातून सुखरूप घरी परतलेल्या राहुल यांना उपचारादरम्यान एक, दोन, नव्हे तर तब्बल 100 बाटल्या रक्त देण्यात आले होते. रक्तदान करून आपल्याला जीवनदान दोणारे कोण आहेत, याचा शोध त्यांनी घेतला तेव्हा 100 पैकी 75 रक्तदाते हे अनोळखी होते. या प्रकाराने भारावून गेलेल्या राहुलने ‘हेल्पिंग हॅन्ड्स फॉर ब्लड’ या चळवळीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीगणेशा केला. सहा वषार्ंनंतर चळवळीला व्यापक रुप प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रासह, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशसह सहा राज्यांमध्ये रक्तदानाविषयी काम करणारे कार्यकर्ते जोडले गेले आहेत. या ग्रुपचे 325 अधिकृत सभासदही आहेत. आतापर्यंत या ग्रुपमार्फत सुमारे दीड हजार रुग्णांना रक्तदाते उपलब्ध करून दिले आहेत.