Sun, May 26, 2019 21:29होमपेज › Pune › पुण्यात जोरदार पाऊस

पुण्यात जोरदार पाऊस

Published On: May 18 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 1:06AMपुणे: प्रतिनिधी 

पुणे शहरात गुरुवारी सायंकाळनंतर वळवाच्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास आकाशात अचानक काळ्याभोर ढगांनी दाटी केली. त्याच्या जोडीला विजांचा प्रचंड कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू होता. वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे दुचाकीस्वारांची चांगलीच धांदल उडाली. शहराचा मध्यवर्ती भाग, स्वारगेट,  शिवाजीनगर, कोथरूड, डेक्‍कन परिसर, सेनापती बापट रस्ता, प्रभात रस्ता, भवानी पेठ, पुणे स्टेशन परिसर, बिबवेवाडी, कात्रज, सहकारनगर, सातारा रस्ता परिसर, धनकवडी, आदी उपनगरांच्या भागात सुमारे तासभर पावसाच्या सरी बरसल्या. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. 

काही भागात वीजपुरवठा खंडित

गुरुवारी सायंकाळी अचानक वादळीवार्‍यासह पाऊस झाल्यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. विशेषत: पर्वती भागातील सिंहगड रोड, विठ्ठलवाडी, खडकवासला, दौलतनगर, मुंढवा, गुरुवार पेठ आदि भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.