Wed, Apr 24, 2019 11:43होमपेज › Pune › पार्सपोर्ट काढणार्‍यांची वाढली डोकेदुखी

पार्सपोर्ट काढणार्‍यांची वाढली डोकेदुखी

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 07 2018 12:35AMपुणे : केतन पळसकर

शहरातील सेनापती बापट रस्त्यावरील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयासह मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्राच्या परिसरामध्ये ‘एजंटगिरी’ करणार्‍यांची संख्या वाढली आहे. त्यामुळेे नागरिकांची आर्थिक डोकेदुखी वाढली आहे. 

पासपोर्ट कार्यालयाच्या परीसरामध्ये एजंटांना प्रवेश नाही. तसेच पासपोर्ट संबंधात कुठलाही व्यवहार करण्याचीही त्यांना परवानगी नाही. मात्र, शहरातील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाच्या परीसरामध्ये आणि मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्राच्या परीसरामध्ये एजंटांचा वावर सर्रासपणे दिसून येत आहे.  पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अत्यंत कीचकट असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. कागदपत्रांची पुर्तता किंवा अर्जामध्ये काही त्रुटी आल्यास नागरिकांना दंडाचा भरणा करावा लागतो. अशाच अडचणीत आलेल्या अर्जदाराला एजंटकडून हेरण्यात येते.  

कर्मचार्‍यांशी लागेबांधे

एका एजंटला पासपोर्ट काढण्या संदर्भात विचारले असता, पासपोर्ट फी वगळता एक हजार पाचशे रुपये जादा असल्याची माहिती त्याने दिली. तसेच, प्रक्रिया सुरु असतांना कार्यालयामध्ये कुठली अडचण आल्यास ती दूर करून देण्याची ग्वाहीसुद्धा देण्यात आली. त्यामुळे, त्यांचे कर्मचार्‍यांशी लागेबांधे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.