Sat, May 30, 2020 01:16होमपेज › Pune › हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणा-यास अटक (video)

हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणा-यास अटक (video)

Last Updated: Feb 27 2020 2:39AM
पुढारी वृत्तसेवा 

नोबेल हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची मेलद्वारे धमकी देऊन १० लाखांची खंडणी मागणाऱ्या उच्च शिक्षित तरुणाला सायबर पोलिसांनी जेरबंद केले. प्रवीण हिराचंद कुंभार (वय ३१, रा. भेकराईनगर, मूळ-झारगडवाडी, बारामती ) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे.

अधिक वाचा : पुणे : बँक घोटाळा; आमदार अनिल भोसले पोलिस कोठडीत (Video)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण उच्चशिक्षित असून त्याने एमएसस्सी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. मागील काही महिन्यांपासून नोकरी नसल्यामुळे तो नैराश्यात होता. त्यामुळे त्याने पैसे मिळविण्यासाठी नोबेल हॉस्पिटल उडवून देण्याचा मेल पाठविला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा धमकीचा मेल पाठवून दिला. खंडणी न मिळाल्यास हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी त्याने दिल्याने हॉस्पिटल प्रशासनासह रुग्णामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 

अधिक वाचा : बारामतीत लाखो रूपयांचा गुटखा जप्त

सायबर पोलिसांनी तपास केला असता, संबंधित मेल गोवा राज्यातून केल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपासानुसार सायबर विभागाने प्रवीणला वाईतून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सायबर पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलिस उपनिरीक्षक किरण औटे, शिरीष गावडे, प्रवीणसिंग राजपूत, संतोष जाधव, प्रसाद पोतदार यांच्या पथकाने केली.

अधिक वाचा : पुणे : शिकारीसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी फासात अडकला बिबट्या

प्रवीणचे लग्न झाले असून त्याने गोव्याला फिरायला जाण्यासाठी वडिलांकडून पैसे घेतले होते. त्यानंतर गोव्यातून प्रवीणने इंटरनेटची सातस्तरीय सुरक्षा भेदून बनावट मेलआयडी तयार केले. त्यानुसार खंडणी मागण्यासाठी संबंधित मेलद्वारे नोबेल हॉस्पिटलला मेल पाठविल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी त्याने दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलचा वापर केला आहे.

अधिक वाचा : बारामती : आरोग्य केंद्रात मद्यधुंद पोलिस कर्मचाऱ्याचा धिंगाणा