Wed, Feb 20, 2019 10:38होमपेज › Pune › अन्यथा फेरीवालाही संपावर जाणार

अन्यथा फेरीवालाही संपावर जाणार

Published On: Dec 07 2017 1:23AM | Last Updated: Dec 07 2017 12:18AM

बुकमार्क करा

पिंपरी :

फेरीवाला घटकांवरील अन्याय थांबला नाही आणि त्यांचे कायद्यानुसार नियोजन केले नाही, येत्या 15 तारखेपर्यंत प्रशासनाने दखल घेऊन बैठक न घेतल्यास पुणतांब्याच्या शेतकर्‍यांप्रमाणे नवी मुंबईतील फेरीवाले बेमुदत संपावर जाणार असून पिंपरी-चिंचवडमधीलही फेरीवालेही यामध्ये सहभागी होणार असा निर्धार एकमताने घेण्यात आला.

महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात फेरीवाला निर्धार सभा घेण्यात आली. या वेळी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, नवी मुंबई हॉकर्स युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे, कॉ. उदय चौधरी, विनिता बाळेकुंद्री, अ‍ॅड. सुरेश ठाकूर, आदींसह मुंबई परिसरातील फेरीवाले उपस्थित होते.नखाते म्हणाले की, केंद्राचा फेरीवाला कायदा अंमलबजावणीस महाराष्ट्र शासन अपयशी ठरले आहे.

याबाबत राज्यमंत्री रणजित पाटील यांना भेटून चर्चा केली. त्यांनी सकारात्मक पत्र पाठवले असून, लवकरच मुंबईतील फेरीवाला घटकांवरील नियमबाह्य कारवाईस विविध मार्गाने विरोध केला जाणार आहे. 11 डिसेंबरला महामोर्चाचे आयोजन केले असून विषय न मिटल्यास फेरीवाल्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. रवी म्हात्रे यांनी सूत्रसंचालन, तर  सदानंद नार्वेकरांनी  आभार केले.