Thu, Jul 18, 2019 06:22होमपेज › Pune › कॉसमॉस बँकेवर हॅकर्सचा दरोडा; ९४ कोटी पळविले

कॉसमॉस बँकेवर हॅकर्सचा दरोडा; ९४ कोटी पळविले

Published On: Aug 14 2018 9:51AM | Last Updated: Aug 14 2018 1:58PMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयाचे सर्व्हर हॅक करून तबल ९४ कोटी ४२ लाख रुपये हकर्सनी ट्रांजेक्शनद्वारे काढण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ही रक्कम हाँगकाँग येथील एका बँकेत वळविण्यात आाली आहे.

याप्रकरणी सुभाष गोखले (वय ५३) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हॉंगकॉंग येथील ए. एल. एम. ट्रेंडिंग लिमिटेड कंपनी आणि अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दिवसांपूर्वी (दि. ११ ऑगस्ट)  दुपारी तीन वाजता हॉकर्सनी बँकेचे सर्व्हर हॅक केले. त्यानंतर जवळपास ७८ कोटी रुपयांची रक्कम भारताबाहेर ट्रांजिक्सशन केली. तर २ कोटी ५० लाखांचे ट्रांजिक्शन भारतात झले आहे असे ऐकून ८० कोटी २० लाख रुपये विसा आणि एनपीसीआयद्वारे केलेले ट्रांजिक्शन अज्ञात व्यक्तीने अप्रुवलकरून काढले. त्यानंतर सोमवारी (दि. १३) हॉकर्सनी सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास हाँगकाँग येथील बँकेत १४ कोटी रुपयांचे ट्रांजिक्शन केले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

वाचा : पेटीएम वापरताय? फसवणुकीपासून सावध रहा!

एटीएम कार्डचा वापर करताय, मग या ५ पाळा

सोशल साईट्सवर माहिती देताय? 'थोडं जपून