Wed, Jul 17, 2019 18:59होमपेज › Pune › हॅरिस समांतर पुलास  पुणे पालिकेचा अडसर

हॅरिस समांतर पुलास  पुणे पालिकेचा अडसर

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 13 2018 12:21AMमिलिंद कांबळे 

पुणे पालिकेच्या निष्काळजी पणामुळे दुसरा पुलाचे काम अजून अर्धवट स्थितीत आहे. तर, तयार पुलही पालिकेच्या नाकर्तेपणामुळे अडकून पडला आहे. 

दोन्ही पालिकेच्या वतीने हॅरिस समांतर एका पुलाचे काम पुर्ण झाले आहे. पुल पूर्ण झाल्याचा अहवाल पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्थापत्य विभागाने महापौर नितीन काळजे यांना 30 मे रोजी दिला आहे. पिंपरी पालिकेने जूनच्या पहिल्या आठवड्यात पुल वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन केले होते.

मात्र, पुणे पालिकेकडून अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने उद्घाटनाची तारीख लांबणीवर पडत आहे. दोन्ही पालिकेच्या अर्थसहायातून पुल तयार झाल्याने दोन्ही पालिका पदाधिकार्‍यांच्या सहमतीने पुलाचे उद्घाटन करण्याचा सूचना सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार पुणे पालिकेचा प्रमुख पदाधिकार्‍यांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आला आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते सदर पुलाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. मात्र, पुणे पालिकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पुलाचे उद्घाटन रखडले आहे.

पुल तयार असूनही तो वाहतुकीस खुला केला जात नसल्याने पिंपरी, भोसरी, फुगेवाडी व दापोडीहून आलेली वाहने बोपोडी सिग्नल चौकात अडकून पडतात. त्यामुळे वर्दळीच्या सकाळ व संध्याकाळच्या वेळेत वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ही कोंडी फोडून वाहतुक सुरळीत करण्यासाठी दोन समांतर पुल बांधण्यात येत आहेत. 

पुणे पालिकेने गांधीनगर झोपडपट्टी अद्यापपर्यंत न हटविल्याने बोपोडीहून दापोडीकडे येणार्‍या पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व झोपड्या हटविण्यात येणार असल्याचा दावा पुणे पालिकेचे अधिकारी करीत आहेत. विलंबामुळे या कामांचा खर्च तब्बल दोन कोटींने वाढला आहे.