Sat, Nov 17, 2018 18:34होमपेज › Pune › पुणे : कोंढवा येथे हँड ग्रेनेड आढळले

कोंढवा येथे हँड ग्रेनेड आढळले

Published On: Mar 15 2018 5:01PM | Last Updated: Mar 15 2018 5:01PMपुणे : प्रतिनिधी 

कोंढवा येथे एन. आय. बी. एम रस्त्यावरील नव्याने विकसित होत असलेल्या उद्यानातील झाडावर हँड ग्रेनेड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

येथील एन. आय. बी. एम. रोडवर असलेल्या कोणार्क इंद्रायू जवळ महापालिकेचे नवीन उद्यान विकसित करण्याचे काम सुरू आहे. कामगार आज नेहमीप्रमाणे याठिकाणी काम करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना एका झाडावर हँड ग्रेनेड ठेवलेले आढळून आले. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांना याबाबत माहिती दिली. कोंढवा पोलिस घटना स्थळी दाखल झाले आहेत.