Mon, May 20, 2019 10:52होमपेज › Pune › हेअरस्टाईलच्या जगाची तरुणाईला भुरळ

हेअरस्टाईलच्या जगाची तरुणाईला भुरळ

Published On: Jun 19 2018 1:26AM | Last Updated: Jun 19 2018 12:38AMपुणे : शंकर कवडे/ प्रसाद जगताप

फॅशनच्या जमान्यात हेअरस्टाईलही लक्षवेधक आणि स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी असावी, याकडे तरुणाईचा कल दिसून येत आहे. बदलत्या काळानुसार फॅशनमध्येही बदल होत असून, नव्या नव्या हेअरस्टाईल करण्याकडे तरुणाईचा ओढा वाढत आहे. केजीपासून कॉलेजपर्यंत मुलींबरोबरच मुलेही हेअरस्टाईल्स करत स्वत:ला स्मार्ट लूक देण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

सौंदर्य आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी केसांची भूमिका तशी मोलाची असते. मग नेहमीच्या हेअरस्टाईलपेक्षा एक वेगळी स्टाईल करण्याकडे तरूणाईची क्रेज वाढते आहे. सध्या स्ट्रेट शॅग, शॅगी क्रॉप, गिल्ड अप डॅपर डू, मिडीयम शॅग, कर्लिपिक, क्रू कट, रॅझोर्ड क्रॉप, बझ कटबलून कट, स्टेप कट, मशरूम कट, स्पाईस कट, झीरो कट, क्रॉस कट या प्रकारच्या हेअरस्टाईल चर्चेत आहेत. बझकट, मोहॉक, क्रेझी केसी, ट्रॉय, माइटी मॅक्स, कूल केसी, इग्जी इडी, झॉन, चिक्की मेटी, स्केटर लॉरेंझो, हँडसम, लुकास, रॉकर रिगन या अनेकांनी नावंही न ऐकलेल्या स्टाईलची मोठी क्रेझ सध्या तरुणांमध्ये आहे. त्यातच हेअर कलरिंगचाही ट्रेंड आला आहे. साधारणपणे मुलींचा प्रांत असलेले हेअरस्टाईलचे हे फॅशनविश्‍व आता मुलांनी जणू खालसाच करायला घेतलं आहे. 

काही वर्षांपासून हॉलिवूड, बॉलिवूड सेलिब्रेटिंसह देशात खेळल्या जाणार्‍या आयपीएल मधील देशविदेशातील खेळाडूंनी ठेवलेल्या हेअरस्टाईलचा ट्रेंडही वाढत आहे. यामध्ये, डेव्हिड बेकहॅम, बॅ्रड पिट, हार्दिक पंड्या, विराट कोहली, सुनिल नारायण यांसारख्या सेलिब्रिटींनी ठेवलेली केसांची स्टाईल, तसेच दाढीच्या स्टाईलही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत.