Sat, Apr 20, 2019 10:08होमपेज › Pune › मांजरी परिसरातील तणाव निवळला

मांजरी परिसरातील तणाव निवळला

Published On: Jan 04 2018 2:07AM | Last Updated: Jan 04 2018 12:47AM

बुकमार्क करा
हडपसर ः वार्ताहर

कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत असतानाच एका गटातील कार्यकत्यांनी परिसरात मोर्चा काढल्याने दुसर्‍या गटातील कार्यकर्त्यांनीही मोर्चाचे आवाहन केले. त्यामुळे महादेवनगर मांजरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी हडपसर पोलिसांनी मोठा बंदोबस्त केल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.   
सकाळी महादेवनगर परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत होता.

त्याचवेळी एका गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याने घोषणा देत मोर्चा काढला होता. काही व्यवसायिकांना दुकाने बंद करायला लावली. काही दुकानांमध्ये जाऊन मोर्चेकर्‍यांनी जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली. किरकोळ दगडफेकीचे प्रकारही घडले. त्यामुळे परिस्थिती बिघडत चालली होती. त्यामुळे दुसर्‍या गटातील कार्यकर्ते हळूहळू एकत्र होऊन त्यांनीही घोषणा द्यायला सुरूवात केली. कार्यकर्ते वाढू लागल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. हडपसर पोलिसांची एक तुकडी महादेवनगरमध्ये दाखल झाली होती.