Tue, Jul 07, 2020 21:02होमपेज › Pune › बारावीचा निकाल आज होणार जाहीर

बारावीचा निकाल आज होणार जाहीर

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 30 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवार, दि.30 रोजी दुपारी 1 वाजता बोर्डाच्या mahresult.nic.in
आणि  mahahsscboard.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.

ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना दुसर्‍या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वस्वाक्षांकित प्रतिंसह गुरूवार, 31 मे ते 9 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर छायाप्रतिंसाठी गुरूवार,31 मे ते 19 जूनपर्यंत अर्ज करता येईल. श्रेणी गुणसुधारासाठी जुलै-ऑगस्ट 18 तसेच फेब्रुवारी-मार्च 19 अशा दोन परिक्षांच्या संधी उपलब्ध असल्याचे मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले आहे.

‘एसएमएस’द्वारेही निकाल विद्यार्थ्यांनी चककडउ  MHHSC space SEAT NO त्यानंतर 57766 या क्रमांकावर एसएमएस केल्यानंतर एसएमएसने निकाल समजेल.

असा पाहा निकाल -

mahresult.nic.in वर गेल्यानंतर महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल किंवा महाराष्ट्र एचएससी निकाल 2018

त्यानंतर परीक्षा बैठक क्रमांक (सीट नंबर) व इतर आवश्यक माहिती भरावी. 

ही सर्व माहिती भरल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. त्यानंतर निकालाची प्रिंटही काढता येऊ शकते.