Thu, Jun 20, 2019 00:40होमपेज › Pune › पुणे : विद्यापीठ चौकात गोळीबार; आराेपीस अटक

पुणे : विद्यापीठ चौकात गोळीबार; आराेपीस अटक

Published On: Aug 18 2018 12:29PM | Last Updated: Aug 18 2018 12:29PMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील नेहमीच गजबजलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात पावणे बाराच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी तरुणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ऐन वर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने चौकात धावपळ उडाली आहे. दरम्यान हल्लेखोर गोळीबार करून पसार झाला हाेता. हिंजवडी पोलिसांनी या आरोपीस पाठलाग करून पकडले. शुक्राचार्य मेहंदळे असे या आरोपी नाव आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात दुपारी पावणे बाराच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला. यात समीर एनपुरे (वय २६, रा. मेहंदळे गॅरेज) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोळीबारानंतर पाषाणच्या दिशेने हल्लेखोर पसार झाला. 

दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ रुग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आले आहे. किरकोळ वादातून गोळीबार झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

असा झाला गोळीबार
समीर हा सेनापती बापट रस्त्याने विद्यापीठ चौकात आला होता. त्यावेळी सिग्नल लागल्याने तो थांबला होता. त्यावेळी हल्ला करणारा तरुण मागील बाजूने दुचाकीवरुन आला. त्याने जवळून समीरवर एक गोळी झाडली. त्यानंतर तो पाषाणच्या दिशेने पसार झाला.