Mon, May 20, 2019 10:05होमपेज › Pune › ‘पार्किंग पॉलिसी’ला आज ‘ग्रीन सिग्नल’?

‘पार्किंग पॉलिसी’ला आज ‘ग्रीन सिग्नल’?

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 1:01AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीवर येणार्‍या ताण लक्षात घेऊन प्रशासनाने तयार केलेल्या ‘पार्किंग पॉलिसी’वर मंजुरीची मोहर शुक्रवारी (दि.22) होणार्‍या सर्वसाधारण सभेत उमटणार आहे. त्यास विरोधकांकडून विरोध होण्याची शक्यता आहेत. तसेच, सभेत शिक्षण समितीच्या 9 सदस्यांची निवड केली जाणार आहे. तसेच, रस्ते खोदाई आणि विविध सेवा वाहिन्यांसाठी भूमिगत कामांसंदर्भाचे धोरण निश्‍चित केले जाण्याची दाट शक्यता आहे. पालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा सलग 3 वेळा तहकूब करण्यात आली. जून महिन्याची सभाही तहकूब झाली. या दोन्ही तहकूब सभा शुक्रवारी होणार आहेत. सत्ताधारी व विरोधकांचा ‘मुड’ पाहता या दोन्ही सभेचे कामकाज होण्याची दाट शक्यता आहे. 

सभेत शहरासाठी सशुल्क पार्किंग पॉलिसी निश्‍चित केली जाणार आहे. शहराची 25 लाखाांच्या पुढील लोकसंख्या आणि वाहण्याची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने जगातील इतर देश व भारतातील मोठ्या शहराचा अभ्यास करून पार्किंग पॉलिसी निश्‍चित केली आहे. या पॉलिसीचे गटनेते व पदाधिकार्‍यांसमोर दोन वेळा प्रात्याक्षिक सादरीरकरण करण्यात आले. मात्र, विरोधकांनी प्रथम शहरात पार्किंग झोन विकसित करून, सार्वजनिक वाहतुक सक्षम करण्याचा मुद्दा लावून धरत याला कडाडून विरोध केला आहे. मात्र, सत्ताधारी भाजप पॉलिसीच्या बाजूने असल्याने बहुमतावर तो निर्णय मंजुर होण्याची शक्यता आहे. 

तसेच, शहरात कश्याही पद्धतदीने रस्ते खोदाई केली जाते. त्यासाठी एक नियम व धोरण असावे म्हणून खोदाई धोरण सभेपुढे ठेवण्यात आले आहे. विविध सेवा वाहिन्या भूमिगत टाकण्यासाठी पालिकेसे रस्ते व पदपथ वारंवार खोदले जातात. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या संदर्भातही  धोरण निश्‍चितीचा विषय सभेत आहे. त्यासही चर्चेनंतर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सभेत शिक्षण समितीवर विविध विषय समितीप्रमाणे 9 नगरसेवकांना संधी दिली जाणार आहे. पक्षीय नगरसेवक बलाबलानुसार समितीमध्ये सत्ताधारी भाजपचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेच्या 1 सदस्य असणार आहेत.  क्रीडा समिती सदस्यतत्वाचा अश्‍विनी बोबडे व विधी समितीचा सदस्यत्वाचा वसंत बोराटे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नव्या सदस्याची निवड सभेत केली जाणार आहे. बोपखेल व खडकी जोणार्‍या मुळा नदीवरील उड्डाणपुलाच्या जागेसाठी संरक्षण विभागास 25 कोटी 81 लाख 51 हजार 200 रूपये निधी देण्यास मान्यता देण्याचा प्रमुख विषय सभेपुढे आहेत.  

263 कोटींची तरतूद वर्गीकरणावरून वादाची शक्यता

पालिकेचे सन 2018-19चे अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपने आपल्या पद्धतीने मंजूर केला आहे. आता पुन्हा अखर्चिक निधीचे दुसरीकडे वर्गीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण 263 कोटींचा निधीचे वर्गीकरणाचे 5 विषय बुधवारच्या (दि.20) सर्वसाधारण सभेत ‘वन-के’ खाली ऐनवेळी दाखल करण्यात आले आहेत. सभेत विरोधकांनी त्यावर कडाडून टीका केली होती. शुक्रवारच्या सभेतील चर्चेत त्यावरून वाद होण्याची दाट शक्यता आहे.