Tue, Jun 18, 2019 21:24होमपेज › Pune › पुण्यात ‘ग्रीन बिझनेस’ कार्यपद्धत

पुण्यात ‘ग्रीन बिझनेस’ कार्यपद्धत

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 06 2017 11:39PM

बुकमार्क करा

पुणे :

पुणे महापालिका आणि जगातील सर्व एल.ई.ई.डी. (लीड) प्रकल्पांना प्रमाणित करणारी संस्था म्हणजेच ग्रीन बिझनेस सर्टिफिकेशन इन्स्टिट्यूट (जी.बी.सी.आय.) यांच्यात आज धोरणात्मक युतीकरार करण्यात आला. या करारानुसार पालिकेच्या ग्रीन बिल्डिंग कार्यक्रमासाठी हरित आणि स्मार्ट बांधकामासाठीची कार्यपद्धती वापरण्यात येणार आहे.  

पुणे महापालिका आणि जी.बी.सी.आय. हे एकत्रितपणे येऊन आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये ग्रीन बिल्डिंग संकल्पनेचा प्रचार करणार आहेत. तसेच ते लीड (लीडरशीप इन एनर्जी अँड एनव्हायर्नमेंट डिझाइन) आणि एज (एक्सलन्स इन डिझाइन फॉर ग्रेटर एफिशियन्सीज) या संस्थांचा समावेश असलेल्या जीबीसीआयच्या हरित व्यवसाय कार्यपद्धतीनुसार (ग्रीन बिझनेस प्रॅक्टिसेस) नव्या आणि विद्यमान बिल्डिंग प्रकल्पांना नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहेत. जी.बी.सी.आय.च्या सहकार्याने, ग्रीन बिल्डिंगच्या पर्यावरण, आर्थिक आणि आरोग्यविषयक फायद्यांविषयी महापालिका समाजाला शिक्षित करेल. या कार्यक्रमांची घोषणा नंतर करण्यात येईल.

पुणे हे एक विकसनशील शहर असून स्मार्ट शहरांमधील एक प्रमुख शहर म्हणून पुण्याचा समावेश होत आहे. लीड आणि एज ही कार्यपद्धती अंगिकारल्यानंतर, पुणे शहरातील ग्रीन बिल्डिंग बांधकांमांना त्याचा फायदा होणार आहे, असे जी.बी.सी.आय. इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मिली मजुमदार यांनी सांगितले.