Sat, Sep 22, 2018 05:44होमपेज › Pune › महाराष्ट्रातील पहिला द्राक्ष लिलाव विक्री बाजार इंदापुरात सुरु

महाराष्ट्रातील पहिला द्राक्ष लिलाव विक्री बाजार इंदापुरात सुरु

Published On: Feb 05 2018 8:21PM | Last Updated: Feb 05 2018 8:21PMइंदापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील थेट लिलाव पध्दतीने द्राक्ष विक्री करणारा पहिला बाजार इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरु केला आहे. या बाजाराचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आला. 

 यापूर्वी शेतकरी द्राक्ष बागेतच व्यापाऱ्यांना विक्री करत असत, मात्र व्यापारी चांगल्या दर्जाचा माल खरीदी करत असत. तो माल एक नंबरचा असायचा व दोन व तीन नंबर दर्जाचा मालाची विक्री करताना तो माल व्यापारी कमी किंमत देऊन खरेदी करत असत. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होत होता. आता  या खुल्या व्यापारी बाजरापेठेमुळे द्राक्ष उत्पादकांस चांगला फायदा होणार असून महाराष्ट्रात प्रथमच पुणे जिल्ह्यातील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने हा लिलाव व्यापार सुरु केल्याने  नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.