Mon, Mar 25, 2019 04:58
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंचे आश्‍वासन

ग्रा.पं.कर्मचार्‍यांच्या मागण्या मंजूर करु

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 18 2017 11:44PM

बुकमार्क करा

वडगाव मावळ : वार्ताहर 

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनश्रेणीसह प्रलंबित मागण्या राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवून लवकरच मंजूर केल्या जातील, असे आश्‍वासन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळास नुकतेच दिले.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ व पुणे, सातारा जिल्हा श्रमिक संघाचे अध्यक्ष खंडुजी घोटकुले, कार्याध्यक्ष राजेंद्र वाव्हळ, संस्थापक अध्यक्ष धनाजी ढावरे, सल्लागार सुभाष तुळवे, तालुकाध्यक्ष गणेश वाळूंजकर यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने नागपूर येथे आमदार संजय(बाळा) भेगडे व आमदार संग्राम थोपटे यांच्यासह ग्रामविकासमंत्री मुंडे यांची भेट घेतली.

शिष्टमंडळामध्ये संघाचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानोबा घोणे, मुळशी तालुकाध्यक्ष नारायण खानेकर, अनिल सांडगे, जीवन गायकवाड, राजेंद्र कांबळे, भाऊ कल्हाटकर, सुजाता आल्हाट, सुनिता लांडगे, सोमनाथ अडिवळे, बाळासाहेब खेडेकर, रामदास जंगम, संतोष तुपे, समीर गायकवाड, विशाल हरगुडे, योगेश खिल्लारी, सुनील कानगुडे आदी सहभागी होते.

या वेळी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना नगरपालिका कर्मचार्‍यांप्रमाणे वेतनश्रेणी अथवा चतुर्थ वेतनश्रेणी, लोकसंख्येच्या आधारावर वाढीव आकृतीबंध, पेन्शन, ग्रॅज्युटी, अपघात विमा, राहण्यासाठी गृहनिर्माण संस्था आदी प्रलंबित प्रश्‍न मांडण्यात आले.

संबंधित सर्व प्रलंबित मागण्या मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवून त्या लवकरच मंजूर करून घेण्याचे आश्‍वासन ग्रामविकास मंत्री मुंढे यांनी दिले असल्याचे खंडूजी घोटकुले, गणेश वाळूंजकर यांनी सांगितले.