Sun, Jun 16, 2019 02:11होमपेज › Pune › सरकार आमचं आयकून न्हाई र्‍हायलं!

सरकार आमचं आयकून न्हाई र्‍हायलं!

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:13AMपुणे : प्रतिनिधी

अगोदर बाप दारू प्याचा... नवराबी दारू पेनारा व्हता, दारू पेऊन रोज माराचा.. त्यामुडे नवर्‍याले सोडून म्हाएरी आली... आता भाऊ बी दारू प्यायले लागला... या सरकारजवळ यवतमाळ जिल्ह्यात दारू बंद व्हावी मनून गेलो. पन हे सरकार बी आमचं आयकून न्हाई र्‍हायलं... सांगा आमी का करू? अशा शब्दात दारूने पीडित असणार्‍या यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी आपले गार्‍हाणे दै. ‘पुढारी’जवळ मांडले.

यवतमाळ जिल्ह्यातील स्वामिनी दारूबंदी आंदोलनांतर्गत दारूपीडित महिलांच्या प्रकट मुलाखतीचे आणि सत्य घटनांवर आधारित नाट्यछटांच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. मन हेलावून टाकणार्‍या कथा मुलाखतीच्या माध्यमातून समोर आल्या. दारूने या महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांच्या कथा ऐकून उपस्थित सुन्न झाले. यावेळी हत्ती गणपती मंडळाचे शाम मानकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते.