Wed, May 22, 2019 10:38होमपेज › Pune › शाळा बंद करण्याच्या निर्णयावर शासन ठाम

शाळा बंद करण्याच्या निर्णयावर शासन ठाम

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 22 2017 1:00AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

राज्य सरकारने कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असणार्‍या ग्रामीण भागातील 1 हजार 292 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचा अनेक सामाजिक तसेच विद्यार्थी संघटनांनी विरोध केला असून शासनाने शाळा बंदचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. परंतु शासन मात्र शाळा बंद करण्याच्या निर्णयावर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत शाळा बंदच करण्याचा शासनाने चंगच बांधल्याचे दिसून येत आहे. त्यासाठीच ही कारवाई लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश प्रधान सचिव नंदकुमार यांनी शिक्षणाधिकार्‍यांना दिले असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

राज्य सरकारने कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असणार्‍या ग्रामीण भागातील 1 हजार 292 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काही शाळा बंद करण्यात आल्या असून काही शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी शिक्षणाधिकार्‍यांना शाळाबंद करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामध्ये एखादी शाळा समायोजित करत असताना काही अडचण आली तर त्याच शाळेच्या जवळील दुसर्‍या शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याचे सांगण्यात आले आहे. तर, शिक्षकांना ताबडतोब समायोजित करून शिक्षकांचे बंद शाळेतील नाव काढून नवीन शाळेत जोडण्याचे आदेश दिले आहेत.

वास्तविक पाहता ‘आरटीई’नुसार मुलाला प्राथमिक शिक्षण हे घरापासून एक किलोमीटरच्या आतील शाळेत उपलब्ध झाले पाहिजे. तर, उच्च प्राथमिक शिक्षण घरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावरील शाळेत उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. मात्र ज्या शाळा बंद करण्यात येणार आहेत. त्यातील ठराविक शाळा सोडल्या तर अनेक शाळा 3 ते 7 किलोमिटर अंतर असलेल्या आहेत.