Sun, Mar 24, 2019 06:44होमपेज › Pune › शासकीय परिचारिका जाणार बेमुदत संपावर

शासकीय परिचारिका जाणार बेमुदत संपावर

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 10:57PMपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन संघटना नर्सिंगच्या क्षेत्रात काम करणार्‍या महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी 21 मार्चला सकाळी 10  वाजता मुंबई येथे लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात सुमारे चारशे ते पाचशे महिला कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा अनुराधा मराठे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

मराठे म्हणाल्या, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने सी.एन.इ.च्या नावाखाली अन्यायकारकपणे निधी संकलन करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय सार्वजनिक आरोग्य विभागात वारंवार बदल्या केल्या जातात. त्यामुळे नर्स म्हणून काम करताना कौटुंबिक प्रश्‍न निर्माण होतात. विनाकारण बदली करणे बंद व्हावे, परिचारिकांसाठी स्वतंत्र संचलनालय असावे, सर्व स्तरावरील शासकीय ठिकाणची परिचारिकांसाठीची पदे भरावी.

सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे परिचारिकांनासुद्धा पगार मिळावेत, रुग्णसेवेशिवाय अन्य कामे देण्यात येऊ नयेत. कामावर असताना सुरक्षितता देण्यात यावी यांसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.