Fri, Apr 26, 2019 15:21होमपेज › Pune › ‘गुडबाय सेलिब्रेशन’ साठी गड- किल्ल्यांना पसंती

‘गुडबाय सेलिब्रेशन’ साठी गड- किल्ल्यांना पसंती

Published On: Dec 30 2017 1:31AM | Last Updated: Dec 29 2017 10:56PM

बुकमार्क करा
लोणावळा : वार्ताहर 

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक लोणावळा शहारासोबतच आता परिसरातील गड किल्ल्याला पसंती देऊ लागले आहेत. यामुळे या ठिकाणी ही बंदोबस्त लावण्याची वेळ पोलीस खात्यावर आल्याने पोलिसांची डोकेदुखी एकप्रकारे वाढली आहे.

सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करताना मित्रमंडळी किंवा कुटुंबासोबत एकत्र येऊन फिरायला जाऊन त्याठिकाणी धमाल करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच त्यासाठी लोणावळ्या सारख्या पर्यटन स्थळाला पर्यटकांची अधिक पसंती असते. मात्र मागील काही वर्षात या पर्यटकांचा कल लोणावळा शहराच्या आजूबाजूला असलेल्या धरणांच्या बॅक वॉटर ला किंवा राजमाची, लोहगड, विसापूर यासारख्या किल्ल्याकडे जाण्यात वाढला आहे. याच प्रमुख कारण म्हणजे त्या ठिकाणचा निसर्ग आणि बिनधोक शांतता. त्यामुळे त्याठिकानच्या स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र त्याचवेळी अशा ठिकाणी जाणार्‍या पर्यटकांची आणि विशेषतः अतिउत्साही तरुणाईची हुल्लडबाजी वाढली असल्याने पोलीस खात्याची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

गडकिल्ल्यांवर जाऊन सेलिब्रेशनच्या नावाखाली नाशापान करणारी काही मंडळी आणि त्यांना रोखण्यासाठी धावणारी दुर्गप्रेमी मंडळी यांच्यात मागील काही वर्षात वादावादी होण्याचे प्रकार याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नशापान करून गडकिल्ल्याचे पवित्र भंग करणार्यांना रोखणे आणि दुर्गसंवर्धन नावाखाली कधीकधी वेळप्रसंगी कायदा हातात घेण्यासही मागेपुढे न पाहणार्‍या मंडळींना आवर घालण्याचे कठीण काम पुढील दोन दिवसात पोलीस दलाला करावे लागणार आहे.