Thu, Apr 25, 2019 18:02होमपेज › Pune › सबको शिक्षा; अच्छी शिक्षा : जावडेकर 

सबको शिक्षा; अच्छी शिक्षा : जावडेकर 

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 16 2018 1:02AMपिंपरीः प्रतिनिधी

महागड्या शाळेमधील शिक्षण चांगले असते हा गैरसमज आहे. शासकीय शाळांमध्येही गुणवत्तापुर्ण व चांगले शिक्षण मिळत आहे. केंद्र सरकारही त्यासाठी प्रयत्नशील असून सबको शिक्षा, अच्छी शिक्षा या धोरणानूसार भविष्यात काम करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. 

पिंपरी कँपातील एका खासगी हायस्कूलच्या इमारती उद्धाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलत होते. महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, श्रीरंग बारणे, पालकमंत्री गिरिश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, माजी खासदार गजानन बाबर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

मंत्री जावडेकर म्हणाले की, शिक्षण हा देशातील प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत हक्क आहे. समाज बांधणीसाठी व देशाच्या प्रगतीमध्ये भर घालण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. देशात सध्या शिक्षणसंस्था उभारणीमध्ये मोठी वाढ होत आहे. या संस्थांमध्ये नफा कमाविणे हाच उद्देश ठेवला जात असल्याची खंत या वेळी त्यांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्याला शिक्षणाची परंपरा आहे.

अनेक महापुरूषांनी याच जिल्ह्यातून शिक्षणाचा पाया रचला आहे. यामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे आदींनी यासाठी मोठे योगदान दिले आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये स्त्रियांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या उत्साहाचा आपण उपयोगच करून घेतला नसल्याची खंतही या वेळी जावडेकर यांनी व्यक्त केली. गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे या वेळी जावडेकर यांनी सांगितले.