Fri, Apr 19, 2019 12:43होमपेज › Pune › ‘बोकडा’ने शेळी पळवल्याची तक्रार ‘वाघा’कडे

‘बोकडा’ने शेळी पळवल्याची तक्रार ‘वाघा’कडे

Published On: Dec 28 2017 10:57PM | Last Updated: Dec 28 2017 10:57PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

उंदराला मांजर साक्ष देणे किंवा मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणे या मराठी म्हणींचा प्रत्यय पुण्यातील एका घटनेने आला. पुण्यात एका बोकडाने शेळी पळवल्याची तक्रार चक्क वाघाकडे करण्यात आली आहे. ही सत्य घटना असून यवत पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे बोकडाने शेळी पळवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात बोकडाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

याबाबतची मिळालेली माहिती अशी की, दौंड तालुक्यातील नांदूर येथील रावसाहेब घुले यांची शेळी दि. २१ रोजी घरासमोरील गोठ्यातून बेपत्ता झाली. त्यानंतर त्यांनी दि.२२ रोजी याबाबतची तक्रार देताना १० हजार रुपये किंमतीची, पांढऱ्या रंगाचे ठिपके असलेली काळ्या रंगाची शेळी अज्ञात बोकडाने फूस लावून नेली आहे किंवा एखाद्या  चोरट्याने मुद्दाम लबाडीच्या इराद्याने नेल्याचे म्हटले आहे.

रावसाहेब घुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस हावलदार वाघ यांनी तक्रार नोंदवून घेवून अज्ञात बोकड किंवा चोरटा यांच्याविरुद्ध गु.र.नं ९५५/१७  भा.दं.वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हावलदार मोहिते करीत आहेत.