पुणे : प्रतिनिधी
पुण्यासाठी खंडपीठ मंजूर झाल्यास त्यासाठी नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून 100 एकर जागा खंडपीठासाठी देण्याचे आश्वासन जलसंपदा राज्यमंत्री मंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी दिले. अशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे पुणे जिल्हा बार असोसिएशनने दिली आहे.
उच्च न्यायलयाच्या खंडपीठाच्या प्रलंबित मागणीसाठी पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी शिवतारे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. पुरंदर येथील जागेबाबत पत्र व्यवहार करण्याचे आदेशही त्यांनी दिले असल्याची माहिती बारचे अध्यक्ष अॅड. सुभाष पावर यांनी दिली.