Thu, Apr 25, 2019 14:07होमपेज › Pune › ‘जन्मोजन्मी हिच पत्नी मिळू दे’

‘जन्मोजन्मी हिच पत्नी मिळू दे’

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 27 2018 11:56PMपिंपरी : प्रतिनिधी

आजवर महिला पुरुषांसाठी जन्मोजन्मी हाच पती मिळू दे यासाठी वटपौर्णिमा करत होत्या. परंतु, या परंपरेला छेद देत पिंपळे गुरव येथे मानवी हक्क सरंक्षण आणि जागृतीच्या वतीने पुरुषांनी वडाच्या झाडाची पुजा करून वटपौर्णिमा साजरी केली.  यावेळी शहरातील जवळपास पन्नास लोकांनी पुजा करुन जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी अशी प्रार्थना केली.  मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेच्या वतीने  तीन वर्षांपासून पुरुष वटपौर्णिमा साजरी करण्यात येते.  पिंपळे गुरव परिसरातून सुरु झालेला हा उपक्रम आता पिंपरी चिंचवड शहरासह पुण्यामध्येही राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे विविधस्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. 

दरवर्षी पूजा करणार्‍यांची संख्या वाढत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात स्त्री व पुरूषांना समान हक्क आहे. मग पुरुषांनीही हे व्रत करण्यास पुढाकार घेतला पाहिजे. आजच्या युगात स्त्री चुल व मूल असे समीकरण न राहता पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात काम करत आहे. म्हणून आम्ही आमच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने वटवृक्षाची पूजा करुण जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी, पत्नीला दिर्घ आयुष्य मिळावे यासाठी वटवृक्षाची पुजा करतो, असे शहराध्यक्ष श्रीकांत जोगदंड यांनी सांगितले यावेळी संस्थेच्या वतीने नागरिकांना प्लास्टीक बंदीची शपथ देण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, डॉ. अभिषेक हरिदास, विकास शहाणे, संगिता जोगदंड, मुरलीधर दळवी, अरुण पवार यांच्यासह अनेक पुरुषांनी सहभाग नोंदवला. 

रविवारी वडांच्या झाडांना पाशमुक्त करणार 

दरवर्षी वडाच्या झाडाला प्रार्थना करुन त्याला जन्मोजन्मी हात पती मिळू दे यासाठी धागे बांधले जातात.  मात्र, एकदा पूजा झाल्यावर या झाडांकडे पहायला कुणाला वेळ नसतो. यासाठी रविवारी (दि.1) परिसरातील झाडांचे पूजेसाठी बांधण्यात आलेले धागे काढून झाडांना मुक्त करण्यात येणार असल्याचे श्रीकांत जोगदंड यांनी सांगितले.