होमपेज › Pune › नितीन आगेच्या खुनाचा तपास ‘सीबीआय’कडे द्या

नितीन आगेच्या खुनाचा तपास ‘सीबीआय’कडे द्या

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 09 2017 12:07AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील तरुण नितीन आगे या विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. त्याचा खटला न्यायालयात सुरू होता. त्याचा निकाल लागल्यानंतर सर्व आरोपी निर्दोष सुटले. सर्व साक्षीदारांनी साक्ष फिरवली होती. त्यामुळे या प्रकरणाचा फेरतपासणीसाठी सीबीआयकडे तपास द्यावा, अशी मागणी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ (आठवले) गटाच्या वतीने करण्यात आली. पिंपरी चौकात माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

के. एम. बुख्तर, रमेश चिमुरकर, बाळासाहेब ओव्हाळ, सिकंदर सूर्यवंशी, सुरेश निकाळजे, लिंबराज कांबळे, राजेंद्र कांबळे आदीसह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

न्यायालयात काही अत्याचार, खूनप्रकरणी साक्षीदार, पुरावे नसतानाही साक्षीदार पुरावे उभे करून केसचा निकाल पाहिजे तसा लावला जातो. नितीन आगे याच्या खूनप्रकरणी मात्र साक्षीदार व पुरावे असतानाही ते फोडून, खोडून आरोपी निर्दोष सुटत आहेत. खुनाचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा, ही मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडेही करण्यात आली.