Fri, Feb 22, 2019 15:44होमपेज › Pune › बलात्कारी पित्याला अटक 

बलात्कारी पित्याला अटक 

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 17 2018 12:36AMपुणे ः प्रतिनिधी

आई घरी नसताना पोटच्या तेरा वर्षाच्या मुलीवर बापानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिच्यावर अत्याचार करणार्‍या नराधम बापाला हडपसर पोलिसांनी अटक केली. विशेष न्यायालयाने 23 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपीचे वय 35 असून आरोपीच्या पत्नीने (वय 32) याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी ह्या मूळच्या औरंगाबाद येथील रहिवासी असून, फुरसुंगी येथे पती आणि तेरा वर्षाच्या मुलीबरोबर राहत होत्या. फिर्यादी या दि. 13 मे रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता अपराध केल्यापासून आरोपी हा फरार होता. त्याने अशा प्रकारचे कृत्य आणखी कोणाबरोबर केले का, याचा तपास करण्यासाठी अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.