Sun, Nov 18, 2018 04:59



होमपेज › Pune › कामगार संघटना कामगारांच्या प्रगतीसाठीच हव्यात : पालकमंत्री बापट

कामगार संघटना कामगारांच्या प्रगतीसाठीच हव्यात : पालकमंत्री बापट

Published On: May 13 2018 3:11PM | Last Updated: May 13 2018 3:11PM



पिंपरी : प्रतिनिधी

परदेशात कामगार संघटना संप करत नाहीत .काळ्या फिती लावून काम करतात आपल्याकडे डाव्या कामगार संघटनांच्या आंदोलनांमुळे अनेक कारखाने बंद झाले आहेत .उत्पादन थांबले आहे .असे होता कामा नये .कामगार संघटनांनी कामगार हा केंद्रबिंदू मानून कामगारांच्या प्रगतीसाठी काम करावे असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले

पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने थेरगांव येथे उभारण्यात येणाऱ्या कै. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवनाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. यावेळी खासदार  श्रीरंग बारणे, अमर साबळे, ,भाजप शहराध्यक्ष  आमदार लक्ष्मण जगताप,  अॅड. गौतम चाबुकस्वार,  उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड,  विरोधी पक्षनेते दत्ता साने,  कर्मचारी महासंघाचे  अध्यक्ष  बबनराव झिंजुर्डे , अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे,नगरसेवक कैलास बारणे ,झामाताई बारणे ,संदीप वाघेरे ,अभिषेक बारणे ,अश्विनी चिंचवडे,निर्मला कुटे , कर्मचारी महासंघाचे  चारुशीला जोशी,संजय कुटे ,महाद्रंग वाघेरे ,हनुमंत लांडगे, अंबर चिंचवडे, अतुल आचार्य ,आबा गोरे, चंद्रकांत इंदलकर, विजय खोराटे, मनोज माछरे, माणिक बुचडे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री बापट म्हणाले ,चांगल्या पद्धतीने कामगार संघटना चालवणे अवघड आहे. कारण कामगारांच्या अनेक मागण्या असतात .दुसरीकडे प्रशासनाची कायद्याची बंधने असतात . त्यातून मार्ग काढावा लागतो.

खासदार साबळे म्हणाले ,ज्या कामगारांच्या बळावर महापालिका व हे शहर उभे आहे त्या कामगारांच्या आनंदाचा आलेख  उंचावत नाही तोवर श्रीमंत पालिका या संकल्पनेस अर्थ नाही कामगारांकडून शासनाकडे येणारा पैसा त्यांच्या कल्याणासाठी खर्च व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

आमदार जगताप म्हणाले की कै शँकर गावडे यांनी केवळ पिंपरी चिंचवड महापालिकेतीलच नव्हे तर राज्यातील पालिका कर्मचाऱ्यांचे नेतृत्व केले त्यांच्या नावाने कामगार भवन उभारणे स्तुत्य आहे
 खा बारणे , आ .चाबुकस्वार यांचीही भाषणे झाली

कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी महापालिकेतील रिक्तपदे भरली जात नाहीत, मानधनावर कर्मचारी घेतले जातात अशी खंत  व्यक्त केली घटागाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ,पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बदल्या याचाही त्यांनी उल्लेख केला कै शँकर गावडे स्मृती कामगार भवन बाबत ते म्हणाले की दीड एकर जमिनीवर 20000 चौ फुटांचे हे कामगार भवन बांधण्यासाठी 11 कोटी रुपये खर्च येणार आहे बोनसच्या वर्गणीतून हा खर्च केला जाणार आहे

पुढील आठवड्यात बैठक

पिंपरी चिंचवड महापालिकेतील कामगारांच्या प्रश्नावर पुढील आठवड्यात आयुक्तांसमवेत बैठक घेऊ असे आश्वासन यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले