होमपेज › Pune › ‘अनुवादा’तही मराठी साहित्याने उतरावे

‘अनुवादा’तही मराठी साहित्याने उतरावे

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 25 2017 1:09AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

अनुवादाच्या क्षेत्रातही मराठी साहित्याने पाहिजे तशी मजल मारली नसून, या क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपर्यंत मराठी अनुवादकांनी उतरावे, असे आवाहन 17 व्या  साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ मराठी भाषा अभ्यासक आणि साहित्यिक डॉ. निशिकांत मिरजकर यांनी व्यक्त केली. 

मराठी समीक्षकांनी देखील संकुचितपणे विचार करणे सोडून देऊन देशातल्या विविध भाषांमधील प्रतिभावान साहित्यिकांचे योगदान लक्षात घेऊन मूल्यमापन केले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

येथील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित 17 व्या  साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन डॉ.  शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते रविवारी (दि. 24) झाले. त्या वेळी डॉ. मिरजकर बोलत होते. 

या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या महापौर मुक्ता टिळक, ‘सरहद’चे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार, प्रमुख संयोजक दिलीप बराटे उपस्थित होते. संजय नहार म्हणाले की, घुमान येथे झालेल्या संमेलनाच्या वेळी पंजाब सरकारने ज्याप्रकारे उदारमतवादी धोरण ठेवून सहकार्य केले, त्याप्रमाणे 2018 मध्ये बडोदा येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी गुजरात सरकारनेदेखील उदारमतवादी धोरण ठेवले पाहिजे.