Tue, Jul 23, 2019 02:35होमपेज › Pune › गवळी गँगचे आणखी दोघे ताब्यात

गवळी गँगचे आणखी दोघे ताब्यात

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 28 2018 1:34AMमंचर : प्रतिनिधी

लोणी (ता. अांबेगाव) येथील एका ताडी दुकानदाराला 40 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गवळी गँगच्या दोन जणांवर मंचर पोलिसांनी गुरुवारी (दि. 26) रात्री गुन्हा दाखल केला. त्यांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे.

लोणी गावानजीक वडगावपीर आहे. वडगावपीर गावची यात्रा 11 मार्च रोजी झाली. त्यानंतर 7 ते 8 दिवसांनी लोणी येथील ताडी दुकानात सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सुरज यादव आला. मोबीनभाईने 40 हजार रुपये मागितले आहे, ते द्या; अन्यथा तुमच्या दुकानाची मोडतोड होईल आणि दुकान पुन्हा सुरू करू देणार नाही, असा दम दिला. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी दुपारी दोनच्या सुमारास सुरज यादव पुन्हा ताडीच्या दुकानात आला. मोबीनभाईने पैसे मागितले आहे. पैशाची व्यवस्था करा, असा दम दिला. त्यानंतर पुन्हा 24 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान ताडी दुकानात सुरज यादव आला. संध्याकाळपर्यत मोबीनभाईने पैशाची व्यवस्था करावयास सागितली आहे. जर पैसे दिले नाही तर दुकानाची तोडफोड करू. इतर दुकानदारांची जशी तोडफोड केली, तशी गत होईल अशी धमकी दिली. त्यानंतर संबधीत दुकानदाराने रात्री सात वाजेच्या सुमारास चायनीज दुकानात बसलेल्या सुरज यादव आणि मोबीन मुजावर यांना 30 हजार रूपये रोख दिले.

यासंदर्भात मंचर पोलिस ठाण्यात मोबीन मुजावर आणि सुरज यादव यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास  पोलिस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करत आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये गवळी गॅगविरोधात खंडणीचे एकुण 3 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानुसार एकुण 9 आरोपी आणि इतर दोन तीन अनोळखी इसम यांच्याविरोधात मंचर पोलिसांनी खंडणीबाबत कारवाई केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.