Tue, Apr 23, 2019 13:37होमपेज › Pune › महापौर राहुल जाधव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

महापौर राहुल जाधव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 07 2018 11:30PMपिंपरी : प्रतिनिधी 

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मुंबईतील एनएससीए सभागृहात तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार विजय वडेट्टीवार, परिणय फुके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी महापौर जाधव यांनी पालिकेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.