Mon, Mar 25, 2019 09:06होमपेज › Pune › अधिकाऱ्यांच्या भितीने रात्रीत कचरा गायब

अधिकाऱ्यांच्या भितीने रात्रीत कचरा गायब

Published On: Dec 02 2017 12:16PM | Last Updated: Dec 02 2017 12:16PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाला कुंभारवळण येथील कचरा प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी सांगण्यात आले होते. कुंभारवळण येथील कचरा प्रकल्प सुरळीत सुरू आहे हे दाखविण्यासाठी तेथील कचरा नगरपालिकेने रात्रीतल्या रात्रीत पुरंदर हायस्कूलकडे पुन्हा हलविल्याचे याचिकाकर्ते डॉ. उदयकुमार जगताप यांनी न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची
छायाचित्रेही त्यांनी सादर केली आहेत. न्या. यू. डी. साळवी आणि न्या. नगीन नंदा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

रात्रीतल्या रात्रीत कचरा हलविण्यासाठी पुरंदर येथील कचरा डेपोच्या गेटच्या कुलपाच्या चाव्या दिल्याच कशा, असा सवालही डॉ. जगताप यांनी न्यायाधिकरणापुढे उपस्थित केला. दरम्यान, कचरा प्रकल्पाला निधी त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकास खात्याच्यासचिवांना नोटीस बजावली होती. याचिकेवरील पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे.