Sat, Sep 22, 2018 02:56



होमपेज › Pune › गाडगेबाबांना करायची होती मनाची स्वच्छता

गाडगेबाबांना करायची होती मनाची स्वच्छता

Published On: Dec 30 2017 1:31AM | Last Updated: Dec 29 2017 11:18PM

बुकमार्क करा




पुणे : प्रतिनिधी

गाडगेबाबा हे कर्ते सुधारक होते. विचार, निर्णय आणि कृती या त्रिसूत्रीत त्यांचे आयुष्य बांधले गेले होते. त्यांनी कीर्तनातून जाणीव जागृती केली. बौद्धिक हुकूमशाही जास्त घातक आहे, याची जाणीव असणार्‍या गाडगेबाबानी सामाजिक परिवर्तनासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांचे विचार परखड असूनही, त्यांना विरोध झाला नाही. कारण, त्यांच्या आचार उच्चार आणि विचारात एकवाक्यता होती. गाडगेबाबाना केवळ परिसराची स्वछता अपेक्षित नव्हती, त्यांना समाजमनाची वैचारिक स्वछता करायची होती, असे मत प्रा. तेज निवळीकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. ‘उपेक्षित समाज आणि गाडगेबाबांचे विचार’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार उपस्थित होत्या.

प्रा. जोशी म्हणाले, उपेक्षितांविषयी वाटणारी कणव हा माटे आणि गाडगेबाबांना जोडणारा समान धागा आहे. श्री. म. माटे हे थोर समाज शिक्षक होते. त्यांचे लेखन आणि जीवन यात भेद नव्हता. त्यांच्या विदवत्तेला कृतीची जोड होती. आपल्या हयातीतली वीस वर्षे त्यांनी दलित बांधवांच्या शिक्षणासाठी वेचली. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी आपले सामर्थ्य पणाला लावले. माटे यांच्या कार्याचे विस्मरण आजच्या समाजाला झाले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक करंदीकर यांनी केले.