Sat, Feb 23, 2019 15:03होमपेज › Pune › ‘जीएसटी सोपा नव्हे क्लिष्ट’ 

‘जीएसटी सोपा नव्हे क्लिष्ट’ 

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 27 2017 11:54PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर प्रणाली (जीएसटी) सोपी व सुटसुटीत करण्यापेक्षा क्लिष्ट करून ठेवली आहे, असे उद‍्गार इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)च्या हिशेब प्रणाली समितीचे अध्यक्ष सीए शिवाजी झावरे यांनी काढले.

आयसीएआयच्या पिंपरी-चिंचवड शाखेतील सीए विद्यार्थी संघ आयोजित केलेल्या जिज्ञासा विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी आयसीएआयच्या पश्‍चिम विभागाचे उपाध्यक्ष सर्वेश जोशी, आयसीएआय  पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष रवींद्र नेर्लीकर, माजी अध्यक्ष सुहास गार्डी,   बबन डांगले, सुनील कारभारी, सचिव युवराज तावरे, उपाध्यक्ष आमोद भाटे, कार्यकारी सदस्य संतोष संचेती आदी उपस्थित होते. 

झावरे  म्हणाले, सरकार देशातील  फक्त 5 टक्के करबुडव्यांसाठी 95 टक्के करदात्यांना वेठीस धरत आहे. कायदे किंवा योजना सोप्या असल्यास नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळतो. त्याची अंमलबजावणीही मोठ्या प्रमाणात होते. ऋचा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, तर मृगांक साळुंखे याने आभार  मानले.