Sat, Jul 20, 2019 23:26होमपेज › Pune › कच-यांच्या वाहनांवर बसणार जीपीएस यंत्रणा

कच-यांच्या वाहनांवर बसणार जीपीएस यंत्रणा

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 20 2018 11:16PMपुणे : प्रतिनिधी 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत  कचर्‍याचे संकलन करून त्याची  वाहतूक वेळेवर व्हावी यासाठी कच-याची वाहतूक करणा-या वाहनांवर  जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव प्रशासनाने संमत केला आहे.जीपीएस यंत्रणेमुळे  कचरा वाहतूक करणारी वाहने नक्की कोठे आहेत.हे प्रशासनास समजण्यास सहकार्य  होणार आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरारातील  कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या हद्दीत स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी माहिती घेण्यात येत आहे.त्यानुसार  देशभरातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये  प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रयत्न करीत आहे. त्यानुसार  केंद्रीय शहर विकास विभागातील पथक केव्हाही कॅन्टोन्मेंट बोर्डास भेट देण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन  कॅन्टोन्मेंट प्रशासनाने परिसर कचरामुक्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.यासाठी  स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोडची संख्या वाढविणे, ओला कचरा-सुका कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती कार्यक्रम राबविणे, सोसायट्यांसह तरुण मंडळांच्या बैठका घेऊन कचरा जिरविण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध योजना  प्रशासनाकडून जोरदार राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून  कच-याची वाहतूक करणा-या वाहनांवर  आता जीपीएस यंत्रणा  बसविण्यात येणार आहे.. 

बोर्डाच्या हद्दीत निर्माण होणारा कचरा गोळा क रण्यासाठी  घंटागाड्या, डंपर, ट्रक आहेत. परंतु अजुनही , काही वॉर्डामध्ये अजुनही कचरा  उचलण्यात  अनियमितता असल्याचे दिसून आले आहे .त्याबाबत नागरिकांच्या देखील तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन कचरा वाहतूक करणा-या वाहनांबाबत पारदर्शकता यावी यासाठी  जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. 

अतुल गायकवाड म्हणाले,“ जीपीएस यंत्रणेमुळे कचरा वाहक गाड्यांचे चालक-कर्मचार्‍यांच्या मनमानी  वृत्तीला चाप बसण्यास मदत होणार आहे. कार्यालयात बसविण्यात येणा-या  सर्व्हरद्वारे सर्व गाड्यांचे लोकेशन प्रशासनाला पाहता येणार आहे. ही जीपीएस यंत्रणा बसविण्यासाठी प्रति युनिट 20 हजार रुपये खर्चाच्या प्रशासनाच्या प्रस्तावास बोर्डाच्या सर्वसाधारण सभेने मान्यता देण्यात आली आहे.