Sun, Mar 24, 2019 23:14
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पुणे शहर परिसरातून थंडी गायब

पुणे शहर परिसरातून थंडी गायब

Published On: Jan 06 2018 6:35PM | Last Updated: Jan 06 2018 6:31PM

बुकमार्क करा
पुणे: प्रतिनिधी

पुणे शहर व परिसरातून बोचरी थंडी गायब झाली असून शनिवारी पहाटेचा गारठा कमी झाला आहे. शहरात शनिवारी १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या दहा-बारा दिवसांपासून शहरातील किमान तापमान ९ ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविले जात होते. शनिवारी मात्र त्यात वाढ होत १३ अंशांची नोंद करण्यात आली. शनिवारचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल २.४ अंशांनी अधिक नोंदविले गेले. यामुळे पुणेकरांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पुढील तीन चार दिवस शहर व परिसरातील किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या घरात राहणार असून बोचरी थंडी आणखी काही दिवस गायबच राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.