Tue, Apr 23, 2019 13:41होमपेज › Pune › तेरे जैसा यार कहाँ !

तेरे जैसा यार कहाँ !

Published On: Aug 05 2018 1:32AM | Last Updated: Aug 05 2018 12:12AMपुणे : प्रतिनिधी

मित्र-मैत्रिणींप्रती प्रेमभाव व्यक्त करणार्‍या मैत्रीचा उत्सव आज (ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार) साजरा होत आहे. त्यासाठी शहरासह उपनगरांतील बाजारपेठा आकर्षक फ्रेंडशिप बॅन्ड्स, भेटवस्तू, शुभेच्छापत्रांनी सजल्या आहेत. मैत्रीदिनाच्या शुभेच्छा आणि मैत्रीच्या धाग्यात गुंफण्यासाठी बाजारपेठांतील विविध रंगाचे फ्रेंडशिप बॅन्ड, भेटकार्ड, मैत्रीची व्याख्या स्पष्ट करणार्‍या भेटवस्तू, किचेन्स खरेदी करण्यासाठी तरुणांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.   

मैत्री कधी, कोणाशी, कोठे व कशी होईल हे सांगता येत नाही. मात्र, मैत्री व्यक्त करण्यासाठीही एक दिवस आहे. तो म्हणजे ‘फ्रेंडशिप डे’. मैत्री या नात्याचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे. मैत्रीचे हेच नाते प्रत्येक जण आपापल्या परीने फुलविण्याचा प्रयत्न करत असतो. महाविद्यालयीन आयुष्यात मैत्रीला सर्वात अधिक प्राधान्य दिले जाते. तरुणाईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या फ्रेंडशिप डे दिवशी आपल्या मित्र-मैत्रिणीला फ्रेंडशिप बॅन्ड बांधून आणि विविध भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतात.

त्यासाठी शहरातील बाजारपेठा सजल्या असून आकर्षक व विविध प्रकारच्या भेटवस्तू तरुणाईचे लक्ष वेधून घेत आहे. फ्रेंडशिप बॅन्डबरोबरच ग्रिटिंग, घड्याळ, फोटोफ्रेम, चॉकलेट्स, टेडी बेअर, परफ्युम, कॉफी मग, की-चेन, चॉकलेट, छायाचित्र असलेला कॉफी मग, डबल पेअर की-चेन, डबल पेअर कॉफी मग यांसारख्या नवनवीन भेटवस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत.

मैत्रीच्या या नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून तरुणांनी खरेदीसाठी गिफ्ट शॉपमध्ये गर्दी केली आहे. लेसचे, नक्षीदार रंगबेरंगी फ्रेंडशिप बॅन्ड सध्या उपलब्ध आहेत. मित्र-मैत्रिणीला स्पेशल गिफ्ट देण्याच्या हेतूने तरुणाई बाजारपेठ पिंजून काढत आहे. याबरोबरच, हॅण्डमेड गिफ्ट्सला तरुणांकडून मागणी होत आहे. यात भेटकार्ड, आकर्षक पॅकिंगमध्ये चॉकलेट्स, किचेन्स, फोटोंचे कोलाज, मित्रासोबतचा सेल्फी असलेला टी मग, ज्वेलरी, एक्सप्लोजन बॉक्स, स्ल्मॅब बुक, की-चेन, फ्रेन्डशिप बॅन्ड आदी गिफ्ट्स खास बनवून घेतले जात आहे. अगदी पाच रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत या भेटवस्तूंच्या किमती आहेत.