Thu, Feb 21, 2019 04:59



होमपेज › Pune › मैत्रिणीचे ‘अफेअर’ सांगितल्याने मारहाण

मैत्रिणीचे ‘अफेअर’ सांगितल्याने मारहाण

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 12:18AM

बुकमार्क करा




पिंपरीःप्रतिनिधी

मैत्रिणीचे ‘अफेअर’ असल्याचे सांगितल्याने चिडलेल्या मित्राने व त्याच्या साथीदारांनी एका तरुणास बेदम मारहाण करून जखमी केले आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 27)  सायंकाळी सहाच्या सुमारास शाहूनगर येथे घडला. मुकेश बजरंग साळुंके (वय 18, रा. चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याने फिर्याद दिली आहे.

ओमकार (पूर्ण नाव माहिती नाही) व त्याच्या तीन मित्रांच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार आणि मुकेश हे दोघे मित्र आहेत. मुकेशने ओमकारला फोन करून तुझ्या मैत्रिणीचे बाहेर प्रेमप्रकरण सुरू असल्याचे सांगितले. याचा राग मनात धरून ओमकारने मुकेशला भेटायला बोलावून इतर मित्रांच्या मदतीने मारहाण केली. तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करीत आहेत.