Thu, Apr 25, 2019 03:36होमपेज › Pune › जन आरोग्य अभियानची ऑनलाईन याचिका 

अपघातग्रस्तांवर मोफत उपचार करा

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:24AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

अपघातग्रस्त रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल केल्यास नातेवाईकांना मोठ्या रकमेचे डिपॉझिट भरायला सांगितले जाते. पण ते न भरल्यास उपचार नकार दिला जातो व त्यामध्ये रुग्णाचा मृत्यू होतो. म्हणून मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्तांवर मोफ त वैद्यकीय उपचार करण्यासाठी एक योजना सूरू करावी, अशी ऑनलाईन स्वरूपाची याचिका ‘जन आरोग्य अभियान’चे समन्वयक अभिजित मोरे यांनी सुरू केली आहे. ही याचिका लहरपसश.ेीस या संकेतस्थळावर सुरू करण्यात आली असून एका दिवसात 100 हून अधिक जणांनी याचिकेला सपोर्ट केला आहे.

या याचिकेत म्हटले आहे की राज्यात शेवटच्या सहा वर्षांत झालेल्या रस्ता अपघातात जखमी झालेला प्रत्येकी चौथा व्यक्‍ती मृत्यू पावला आहे. अशा प्रकारे 2011 ते 2016 पर्यंत 78 हजार जणांचा मृत्यू झाला असून 2.47 लाख जखमी झाले आहेत. अपघात झालेल्या व्यक्‍तीकडे एका वेळी मोठया प्रमाणात रक्‍कम नसते. त्यावेळी खाजगी रुग्णालये त्याला दाखल करून उपचार करण्यास नकार देतात. यामध्ये त्या रुग्णाला घेउन रुग्णवाहिका फिरते आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नुकताच दिल्‍लीमध्ये अपघात झालेल्या रुग्णाला याच कारणामुळे उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. याची दखल घेत त्यांनी रुग्ण दाखल केल्यापासून 48 तास मोफत उपचार करण्यासाठी योजना सूरू केली. त्याचप्रमाणे केरळ आणि कर्नाटक राज्यातही अशी योजना सूरू करण्यात आली आहे. जर ही राज्ये योजना सुरू करू शकतात तर देशात दरडोई उत्पन्न जास्त असणार्‍या महाराष्ट्रात का सुरू होउ शकत नाही, असा प्रश्‍न या याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.